नवी दिल्ली- केरळमधील दोन महिलांनी शबरीमला येथील भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतल्याचा दावा केला आहे. केरळमधील दोन महिलांनी शबरीमला येथील भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असा निकाल दिला होता.
या निर्णयानंतरही
आतापर्यंत एकही महिलेला अयप्पांचे दर्शन घेता आलेले नाही. अनेक महिला
कार्यकर्त्यांनीही मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तीव्र
विरोधामुळे त्यांना प्रवेश करता आला नव्हता. दरम्यान, मुख्यमंत्री पी.
विजयन यांनी ज्या महिलांना दर्शन घ्यायचे आहे, त्यांना पोलिसांनी संरक्षण पुरवण्याचा आदेश दिला आहे.
दुसरीकडे शुद्धिकरण विधीसाठी मंदिर समितीकडून दर्शन बंद करण्यात आले. दोन महिलांनी
प्रवेश केल्यामुळे मंदिर समितीकडून मंदिरात शुद्धिकरण करण्यात आले.